Solapur APMC Onion : सोलापूर एपीएमसीमध्ये कांद्याची विक्रमी आवक, सोलापूर लासलगावला मागे टाकणार?
गेल्या काही दिवसांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती चर्चेत आहे. याच कारण म्हणजे, ही बाजार समिती देशातील सर्वात जास्त कांदा आवक असलेली बाजार समिती ठरलीय. यंदा पोषक वातावरणामुळे पीक चांगलं आलंय आणि कांद्याची आवक वाढलीय.