Sanjay Gaikwad : बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका
abp majha web team
Updated at:
05 Jul 2022 07:39 PM (IST)
बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केलीय. राष्ट्रवादीची सुपारी घेऊन शिवसेना संपवायला निघाले होते अशी घणाघाती टीका गायकवाड यांनी केलीय. सत्तांतराच्या नाट्यानंतर संजय गायकवाड पहिल्यांदाच बुलढाण्यात परतले. यावेळी त्यांनी संजय राऊतांना लक्ष्य केलं. तसंच उद्धव ठाकरे हे देवमाणूस असून त्यांच्याभोवतीचे लोक त्यांना सुचू देत नसल्याचंही गायकवाड यांनी म्हटलंय.