MP Prataprao Jadhav यांची बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदी पुनर्नियुक्ती,ठाकरेंनी केली होती हकालपट्टी
Continues below advertisement
Prataprao Jadhav : 50 आमदारांच्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या 12 खासदारांनी देखील जाहीर पाठींबा देऊन संसदेतील आपला गटनेता बदलला होता. यानंतर खासदारांवर देखील पक्षाकडून कारवाई करण्यात आली. नुकतीच पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत खासदार प्रतापराव जाधव यांची बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खासदार प्रतापराव जाधव यांची पुन्हा एकदा बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदी पुनर्नियुक्ती करत असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले आहे.
Continues below advertisement