RBI MPC | कर्जाचा हप्ता घटणार? 0.25% कपातीची शक्यता, 1 ऑक्टोबरला घोषणा

Continues below advertisement
आजपासून आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक सुरू झाली आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आरबीआयच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, महागाई नियंत्रणात राहिल्यामुळे व्याजदरांमध्ये आणखी पाव टक्क्यांनी कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या कर्जाचे हप्ते (EMI) आणखी कमी होऊ शकतात. या बैठकीत व्याजदरांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. पतधोरण समितीच्या या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांवरील व्याजदरांवर थेट परिणाम होईल. दरम्यान, आरबीआय गव्हर्नर 1 ऑक्टोबर रोजी पतधोरण जाहीर करणार आहेत. या घोषणेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे, कारण यामुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक नियोजनावर मोठा परिणाम होणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola