Ravsaheb Danve Reaction on Arjun Khotkar Meeting : खोतकरांच्या भेटीनंतर दानवेंचं मोठं सूचक वक्तव्य
Continues below advertisement
Raosaheb Danve : शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंना आयुष्यभर साथ देणार असल्याचे सांगितले होते, मात्र काल ते शिंदे गटात सामील झाले. शिवसंवाद यात्रेपर्यंत आदित्य ठाकरेंसोबत राहिले आणि आता त्यांनी ‘जय महाराष्ट्र ’ म्हटलं आहे. काल सकाळी त्यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या प्रयत्नाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी हातमिळवणी करून जुन्या तक्रारी दूर केल्या असल्याचं खुद्द दानवेंनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे. तसेच कडू विषय आता पूर्णपणे संपले असल्याचं सांगत दानवेंनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.
Continues below advertisement
Tags :
Shiv Sena Uddhav Thackeray Eknath Shinde Meeting Arjun Khotkar Ravsaheb Danve Shiv Sena Rebel Ravsaheb Danve Arjun Khotkar Meet