
Ravindra Waikar Special Report : ठाकरेंचा आणखी एक आमदार शिंदेंच्या गळाला?, ठाकरेंना मोठं खिंडार?
Continues below advertisement
Ravindra Waikar Special Report : ठाकरेंचा आणखी एक आमदार शिंदेंच्या गळाला?, ठाकरेंना मोठं खिंडार? अखेर ठाकरे गटाचे निष्ठावंत रविंद्र वायकरही शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती आहे. रविंद्र वायकर लवकरच शिंदेंच्या शिवसेनेते प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत ही महत्त्वाची माहिती समोर येतेय. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकर यांना ईडीने समन्स बजावल्यावर २९ जानेवारीला वायकरांची तब्बल ९ तास ईडी चौकशी झाली. वायकरांना ईडी चौकशीसाठी तीनदा समन्स बजावण्यात आलं होतं आधी दोनवेळा वायकर प्रकृतीचं कारण देत चौकशीला हजर राहीले नाहीत. मात्र तिसऱ्या समन्सनंतर त्यांनी चौकशीला हजेरी लावली. मात्र ही चौकशी राजकीय दबावापोटी झाल्याचा आरोप वायकरांनी तेव्हा केला होता.
Continues below advertisement