Ravindra Waikar | शिवसेनेच्या नाराज रवींद्र वायकर यांचं अखेर पुनर्वसन, मुख्यमंत्री कार्यालयात वर्णी | ABP Majha
Continues below advertisement
शिवसेनेचे माजी मंत्री रवींद्र वायकर यांची अखेर मुख्यमंत्री कार्यालयात म्हणजेच CMO मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य समन्वयक अधिकारी असं विशेष कॅबिनेट दर्जाचं पद तयार करून नाराज रवींद्र वायकर यांचं थेट मुख्यमंत्री कार्यालयात पुनर्वसन करण्यात आलं आहे. यामुळे शिसवेनेतील इतर नाराज आमदारांसह मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत.
Continues below advertisement