Ravindra Waikar Shiv sena : रविंद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार, शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

Continues below advertisement

Ravindra Waikar Shiv sena : रविंद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार, शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
रविंद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का 
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रवींद्र वायकरांचा जाहीर पक्षप्रवेश होणार आहे.. गेल्या अनेक दिवसांपासून रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. अखेर त्यांच्या पक्षप्रवेशाला मुहुर्त सापडला.. कालच उद्धव ठाकरेंनी वायकरांच्या मतदारसंघाचा दौरा केला. आणि यावेळी रवींद्र वायकरही उपस्थित होते..जोगेश्वरी कथित घोटाळ्या प्रकरणी रवींद्र वायकरांची ईडी चौकशी सुरु आहे..या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी ट्वीट करुन, रवींद्र वायकरांना ईडी धमकावत असल्याचं म्हटलं होतं. तसेच, रवींद्र वायकरांना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी दबाव असल्याचंही संजय राऊतांनी म्हटलं होतं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram