Ravindra Waikar Special Report : रवींद्र वायकर यांच्या माणसाजवळ EVM चा ओटीपी?

Ravindra Waikar Special Report : रवींद्र वायकर यांच्या माणसाजवळ EVM चा ओटीपी

मुंबईतल्या उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे रवींद्र वायकर ४८ मतांनी विजयी झाले,पण पराभूत उमेदवार अमोल कीर्तीकरांना हा पराभव मान्य नाही. मतमोजणीत संशयास्पद गोष्टी घडल्याचा त्यांचा आरोप आहे आणि कोर्टात धाव घेण्याचाही ते प्रयत्न करतायत. या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी वंदना सुर्यवंशी यांनी अनेक प्रश्न आणि शंकांची उत्तरं दिलीयत. पाहू या यावरचा स्पेशल रिपोर्ट..

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातला निकाल लागून आता पंधरा दिवस होत आलेयत.पण मतमोजणीवेळी घडलेल्या संशयास्पद घटनांचं कवित्व संपायला तयार नाही. शिवसेना उमेदवार रवींद्र वायकरांचा मेहुणा आणि निवडणूक प्रतिनिधी मंगेश पंडिलकरकडून झालेल्या मोबाईल वापराची बाब आज समोर आली. यावर त्यावेळच्या निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी काय म्हणाल्या बघा..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola