Ravindra Waikar : 4 वेळा नगरसेवक, 3 वेळा आमदार; वायकर म्हणजे ब्रँड! Lok Sabha 2024

Continues below advertisement

मुंबई : रविंद्र वायकर (Ravindra Waikar)  यांना उत्तर पश्चिममधून शिवसेनेकडून अखेर  उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वायकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांची काल रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली होती.  यावेळी या दोघांमध्ये बराच काळ चर्चा सुरु होती. या बैठकीअंती वायव्य मुंबईतून(Mumbai North west)  रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे.या बैठकीनंतरच रवींद्र वायकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.  आता ईडीची चौकशी सुरू असणाऱ्या रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तिकर लढत होणार आहे.  

रवींद्र वायकर हे सोमवारी रात्री उशीरापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरी होते. ते एकटेच एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले होते. यावेळी या दोघांमध्ये बराच काळ चर्चा सुरु होती. या बैठकीअंती वायव्य मुंबईतून रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले. रवींद्र वायकर हे रात्री अडीचच्या सुमारास एकनाथ शिंदे यांच्या घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना वायव्य मुंबईतून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram