Ravindra Dhangekar Pune Land Row: पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होणार? धंगेकरांची मोठी मागणी

Continues below advertisement
पुण्यातील कोरेगाव पार्क (Koregaon Park) येथील वादग्रस्त जमीन व्यवहार आणि जैन बोर्डिंग (Jain Boarding) प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. धंगेकर म्हणाले, 'माझ्या दृष्टीने जैन बोर्डचा विषय संपलेला नाही, ह्याच्यामध्ये ज्यांनी चोरी केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सिस्टमची चौकशी झाली पाहिजे'. कोरेगाव पार्कमधील ४४ एकर जागेचा व्यवहार अजित पवारांनी रद्द केल्याची घोषणा केली असली तरी, या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे. दोन्ही प्रकरणांची ईडीमार्फत (ED) चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने दोन दिवसांत विषय संपला, पण जैन बोर्डिंग प्रकरणात २०-२५ दिवस लागले, असे म्हणत त्यांनी कारवाईतील फरकावर बोट ठेवले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola