Pune Politics: 'मंत्रीपद वाचवायचं असेल तर विषय मिटवा', Fadnavis यांच्या सल्ल्यानेच Mohol नतमस्तक - धंगेकर
Continues below advertisement
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या वादावरून (Jain Boarding House Land Deal) केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि शिवसेना नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'जर तुमचा विषय मिटला नाही तर तुम्हाला मंत्रीपदापासून लांब रहावं लागेल, असा सक्त सल्ला देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मोहोळांना दिला आहे', असा खळबळजनक दावा धंगेकर यांनी केला आहे. याच कारणामुळे मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंग हाऊसला भेट देऊन नतमस्तक होण्याची भूमिका घेतली, असेही धंगेकर म्हणाले. पुण्यातील जैन बोर्डिंगची जमीन विकसकाला विकल्याप्रकरणी मोहोळ यांचा संबंध असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे, तर मोहोळ यांनी हे सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement