Ravindra Dhangekar : जमीन घोटाळ्यावरून धंगेकर आक्रमक, मोहोळांवर गंभीर आरोप

Continues below advertisement
शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री व्यवहारावरून गंभीर आरोप केले आहेत. ‘ज्यांनी हे सगळं कांड केलंय, त्यांनी महावीरांचे मंदिर सुद्धा गहाण ठेवलं; हा संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे,’ असं म्हणत धंगेकर यांनी मोहोळांवर जोरदार टीका केली आहे. धंगेकर यांनी मोहोळांचे एक व्यंगचित्र ट्वीट करून त्यांना 'जाग्या मोहोळ' संबोधले आणि जमीन हडपल्याचा आरोप केला. या प्रकरणात मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले आहेत, मात्र धंगेकर यांनी मोहोळांचा राजीनामा मागितला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चौकशीची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे. हा व्यवहार संशयास्पद असून यात मोठे षडयंत्र असल्याचा दावा धंगेकर यांनी केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola