Ravindra Dhangekar : पुण्यातल्या जागा गिळणारे 'जाग्या मोहोळ' धंगेकरांचा Murlidhar Mohol वर निशाणा
Continues below advertisement
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या (Jain Boarding House) जमीन विक्री प्रकरणावरून राजकारण तापले असून, शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'हा योगायोग नाही हा प्लॅनर आहे,' असा थेट हल्लाबोल धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावर केला आहे. या प्रकरणात मोहोळ यांचा थेट संबंध असून, त्यांनी काही लोकांना हाताशी धरून जैन समाजाची जागा हडपण्याचा कट रचल्याचा दावा धंगेकर यांनी केला आहे. मोहोळ यांनी हे आरोप फेटाळून लावले असले तरी, धंगेकर यांनी या प्रकरणाची कागदपत्रे आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. जैन समाजाच्या या जागेवरील महावीरांचे मंदिर घाण ठेवल्याने हा केवळ जैन समाजाचाच नव्हे तर संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे, असेही धंगेकर म्हणाले. याप्रकरणी रजिस्ट्रार कार्यालय, महानगरपालिका आणि धर्मादाय आयुक्त अशा सर्वांनी मिळून हे कांड केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement