Ravikant Tupkar On Bachchu Kadu : मंत्री गावात आले तर त्यांना गावबंदी करू, रविकांत तुपकरांचा इशारा
Ravikant Tupkar On Bachchu Kadu : मंत्री गावात आले तर त्यांना गावबंदी करू, रविकांत तुपकरांचा इशारा
बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलो आहोत.. बच्चू कडू यांनी हाती घेतलेली लढाई आम्ही आमच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात लढत असतो.. या राज्यात शेतकरी पोरका झाला आहे, पण बच्चू कडू यांनी आस्वासक आंदोलन सुरू केलं आहे.. जगाच्या पाठिवर सगळ्यात कठीण आंदोलन म्हणजे अन्नत्याग आंदोलन आहे.. बच्चू कडू यांच आंदोलन हे प्रामाणिक आहे.. या राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. इंग्रजांपेक्षा दादागिरी हे सरकार करत आहे.. इंग्रज गोरे होते ते ओळखु येत.पण हे ओळखू येत नाही इंग्रज पुरले पण ही अवलाद पुरली नाही.. शेतकरी संघटित होत नाही. अंगवाडी महिला देखील एकत्र होतात. केसेस खूप होत्या त्यामुळे मी बायकोच वकील करून घेतली.. शेतकऱ्यांच्या मुलाला कोनी मुलगी देत नाही.. बच्चू कडु एखाद्या मोठ्या पक्षात असते तर कायम मंत्री राहले असते... आम्ही तुमच्या साठी आंदोलन करतो..पण शेतकरी येत नाही. आता संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कर्जमाफी एकत्र या..सर्व मतभेद बाजूला ठेऊन एकत्र या... या सरकारला सर्व संघटना संपवायच्या आहे..यांना शहरी नक्षलवादाच्या नावाखाली संघटना संपवायच्या आहे.