Vaidyanath Sugar Factory Sold वैद्यनाथ कारखाना विक्री प्रकरण, तुपकर न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत

Continues below advertisement
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या (Vaidyanath Sugar Factory) विक्रीवरून वाद निर्माण झाला असून, शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली आहे. 'पंकजा मुंडे यांनी सुरुवातीला भाडेतत्त्वावरती दिलेल्या कारखान्याची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली', असा थेट आरोप रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला आहे. संघटनेचे पदाधिकारी कुलदीप करपे यांच्या मते, हा व्यवहार सभासद आणि शेतकऱ्यांना विश्वासात न घेता झाला आहे. हा कारखाना शेतकऱ्यांच्या जमिनीवर उभा असल्याने त्याच्या विक्रीला कायदेशीर मर्यादा आहेत आणि हा व्यवहार म्हणजे बँकांची कर्ज बुडवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही संघटना करत आहे. या प्रकरणी कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola