Ravikant Tupkar On Ladki Bahin : दारू महाग करून तेच पैसे लाडक्या बहिणीला द्यायचे? हे सरकराचं पाप
Ravikant Tupkar On Ladki Bahin : दारू महाग करून तेच पैसे लाडक्या बहिणीला द्यायचे? हे सरकराचं पाप
कुठल्याच लाडक्या बहिणींनी आम्हाला पंधराशे रुपये द्या.... म्हणून मोर्चा काढला नव्हता, मात्र इकडे शेतकरी मरतोय... तो कर्जमाफी मागतोय सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसा नाही. उलट दारू महाग करायची आणि तोच पैसा लाडक्या बहिणींना द्यायचा...? हे सरकारचं पाप आहे. आमदार खासदारांचे परदेशातील काळ्या खात्यातील पैसे काढून ते राज्यात आणावे त्यामुळे कुठलाच शेतकरी सध्या कर्ज भरणार नाही . सरकारने समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग असे जनतेला नको असलेले प्रकल्पांना स्थगिती देऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी.त्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरणार असल्याची घोषणा आज रविकांत तुपकर यांनी केली यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.