Ravi Rana : रोहित पवार यांचा अभ्यास कमी;रोहित पवारांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओवर राणांची प्रतिक्रीया

Continues below advertisement

Ravi Rana :  रोहित पवार यांचा अभ्यास कमी;रोहित पवारांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओवर राणांची प्रतिक्रीया काल रोहित पवारांनी भाजपच्या एका सभेतील व्हीडिओ ट्वीट केला होता. या व्हिडीओत गरीब माणसांच्या पैशातूनही हे कसं कमिशन खातात हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या याच व्हीडिओवर रवी राणांनी उत्तर दिलंय. रोहित पवार यांचा अभ्यास कमी आहे... अमित शहा यांच्या सभेला लाखोंच्या संख्येने लोक आले होते... या सर्व लोकांच्या सोयीसाठी इतक्या तळपत्या उन्हात त्यांना पाणी पाजण्यासाठी आम्ही काही महिलांना आणलं होतं. तसंच ज्या महिला तिथे पाणी वाटण्यासाठी होत्या त्यांचाच व्हिडिओ विरोधकांनी घेतला आणि त्यात महिला खरं बोलल्या, आणि तोच व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला. असंही राणा म्हणालेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram