Ravi Raja on Congress : माझी खदखददिल्लीपर्यंत पोहचवली होती, मात्र कुणीही दखल घेतली नाही

Continues below advertisement

Ravi Raja on Congress : माझी खदखददिल्लीपर्यंत पोहचवली होती, मात्र कुणीही दखल घेतली नाही

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवी राजा यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विधानसभेचे विरोधीपक्ष नेतेपद भूषवलेल्या मधुकरराव पिचड, नारायण राणे यांच्यापासून एकनाथ खडसे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षांतर केल्याच्या परंपरेत आता माजी नगरसेवक आणि महापालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते रवी राजा यांची भर पडली आहे.मुंबई महापालिकेचे पाचवेळा नगरसेवक असलेले रवी राजा यांना सायन-कोळीवाडा मतदारसंघातून काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवायची होती. पण, त्यांच्या या डावाला राज्यातील काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा मिळाला असता, मात्र हायकमांडने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. 44 वर्षीय सेवेचा सन्मान न केल्याची केली खंत त्यांनी व्यक्त केली. आता देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत ते भाजप प्रवेश करत आहेत. 019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे कॅप्टन तामिळ सेल्वन यांचा 14 हजार मतांच्या फरकाने पराभव झाल्यानंतर काँग्रेसने गणेश यादव यांना तिकीट दिले आहे. रवी राजा सायन-कोळीवाड्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी काँग्रेस सोडल्यामुळे पक्षाचा, विशेषतः तमिळ आणि मराठी मतदारांचा पाठिंबा कमी होईल. सत्ताविरोधी लढा देत असलेल्या कॅप्टन तमिलसेल्वन यांना भाजपमध्ये प्रवेश केल्याने बळ मिळणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram