Coronavirus | रत्नागिरीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; झेडपीच्या सीईओंना कोरोनाची लागण

Continues below advertisement
रत्नागिरी जिल्हावासियांच्या चिंतेत आता दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे. कारण कोरोनाची आकडेवारी आता दिवसेंदिवस वाढत आहे. रत्नागिरी पोलीस अधिक्षकांनंतर आता झेडपीच्या सीईओंना कोरोनाची लागण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना घरीच क्वारंटाईन करून ठेवले गेले आहे. जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. पण, त्यांची स्वॅब तपासणी केली असता त्यांचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सरकारच्या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार त्यांच्यावर घरीच उपचार केले जाणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram