Ratnagiri: रत्नागिरीच्या आकाशात दिसलेल्या तबकडीची सोशल मिडियावर जोरदार चर्चा ABP Majha
Continues below advertisement
रत्नागिरी जिल्ह्यात आकाशात दिसलेल्या विशिष्ट आकारच्या आणि प्रकाशमान होणाऱ्या वस्तुमुळे सध्या चर्चांना उधाण आलंय.. आकाशात दिलेली आणि काही काळ प्रकाशमान होत गायब झालेली वस्तु किंवा ती गोष्ट नेमकी काय आहे? याबाबत एक उत्सुकता दिसून येतेय.. दरम्यान, हि गोष्ट परग्रहावरील तबकडी किंवा युएफओ तर नाही ना? असा देखील सवाल केला जातोय. दरम्यान, रत्नागिरी शहर आणि संगमेश्वर तालुक्यातील काही ठिकाणांहून अशा अनुभव काहींना घेतलाय. 18 डिसेंबर ते 22 डिसेंबरच्या कालावधीत अशा प्रकारे आकाशात एका सरळ रेषेत प्रकाशमान होणाऱ्या वस्तु दिसल्याचा दावा केला जात आहे. त्याचे व्हिडीओ आणि फोटो देखील सध्या कुतुहलापोटी मोबाईलच्या माध्यमातून फिरताना दिसतोय..
Continues below advertisement