Flood Alert | Ratnagiri च्या Jagbudi नदीला पूर, Khed शहरावर पुराचं संकट!
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. खेड नगर परिषदेने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नारंगी आणि जगबुडी नदीला पूर आल्याने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आल्या आहेत. जगबुडी नदीची पाण्याची पातळी सात पूर्णांक वीस मीटरवर पोहोचली आहे. यामुळे खेड शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून, आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे.