Ratanagiri :रामदास कदम आणि  रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांची प्रतिष्ठा पणाला : Abp Majha

रत्नागिरीच्या मंडणगड आणि दापोली या नगरपंचायतींसाठी आज मतदान होतंय. शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला शिवसेनेच्या बंडखोरांचंच आव्हान आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम आणि पालकमंत्री अनिल परब यांच्यातला संघर्ष उघड झाला आणि कदम समर्थकांनी शिवसेनेलाच थेट आव्हान दिलं.  त्यामुळे रामदास कदम आणि  रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांची प्रतिष्ठा पणाला लागलेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola