Ratnagiri Rains : Chiplunमध्ये जोरदार पाऊस , चिपळूण बाजारपेठेत पाणी शिरलं

चिपळूणमध्ये जोरदार पाऊस पडतोय. त्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पातळीतही वाढ झालीये. वाशिष्टी नदी दुथडी भरून वाहतीये. वाशिष्ठी नदीचं पाणी चिपळूणच्या बाजार पेठेतही पाणी शिरलंय. त्यामुळे आपल्या दुकानातील साहित्य हलवण्यासाठी दुकानदारांची व्यावसायिकांची धावपळ उडाली आहे. तर तिकडे मुंबई-गोवा महामार्गावरील खेड जगबुडी नदी धोक्याची पातळीवर आहे. जगुबुडी नदीच्या पुराचं पाणी बाजारपेठेत शिरलंय. खेड मटण मार्केट, ख्वाजा स्वामिल, गांधी चौक, निवाचा चौक, येथे पुराचं पाणी शिरलंय. त्यामुळे इथेही सामान सुरक्षित ठेवण्यासाठी दुकानचालकांची धावपळ उडाली आहे. नगरपरिषदेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola