Ratnagiri Rain | रत्नागिरीतील जगबुडी आणि वाशिष्टी नदीची पाणी पातळी वाढली
सतत पडणाऱ्या पावसामुळे उत्तर रत्नागिरीतील चिपळूण आणि खेडमधील नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील खेडची जगबुडी नदी आणि चिपळूणची वाशिष्टी नदी या दोन प्रमुख नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. नद्या सध्या धोका पातळीच्या वर वाहत असल्याने स्थानिक प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर चिपळूण नजिकच्या वाशिष्टीचा ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.