Tiware Dam आज वर्ष पूर्ण; जखमा अजूनही ताज्या, तिवरेवासीय अजूनही मदतीपासून वंचित
जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून आज एक वर्ष पूर्ण झालं. मात्र, त्या काळ रात्रीच्या आठवणी अजूनही जश्याच्या तश्याचं आहेत. ती काळ रात्र होती दोन जुलै 2019, वार सोमवार, रात्री 9 वाजून 35 मिनिटांनी धरण फुटलं आणि सर्व होत्याचं नव्हतं झालं. धरण फुटल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात धरणाच्या बाजुला असलेली घरे वाहूण गेली. या घटनेत गावातील निष्पाप 22 जणांचा मृत्यू झाला.