Ratnagiri :ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या 82 पिल्लांना समुद्रात सोडलं : ABP Majha
रत्नागिरी जिल्ह्यातील गावखडी येथे संरक्षित ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या 82 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आलं. मादी कासवाने घरटे बनविल्यानंतर साधारण 50 ते 60 दिवसानंतर पिल्लं घरट्यातून बाहेर येण्यास सुरुवात होते. यासाठी वनविभागाचे कर्मचारी, स्थानिक आणि कांदळवन प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.