Ratnagiri Water Issue : रत्नागिरीत पाणी टंचाई, शीळ धरणात 5 जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात सध्या 5 जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नगरपरिषदेने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात पाणीकपात केल्यामुळे शीळ धरणातील पाणीसाठा २१ जूनपर्यंत पुरेल असा दावा करण्यात येतोय. शीळ धरणात सध्या 0.589 दशलक्ष घन मीटर इतका जिवंत पाणीसाठा आहे. तर 0.562 दशलक्ष घन मीटर इतका मृत पाणीसाठा आहे. दरम्यान धरणातील पाणीसाठा संपत आल्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असं आवाहन नगपरिषदेकडून करण्यात येतंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola