Ratnagiri Protest | रत्नागिरीत DEFENSE PROJECT विरोधात मोर्चा, MIDC रद्द करण्याची मागणी

रत्नागिरी जिल्ह्यातील खंडाळा येथे संरक्षण शस्त्र सामग्री तयार करणाऱ्या प्रकल्पाविरोधात मोर्चा काढण्यात आला आहे. उद्योगमंत्र्यांच्या मतदारसंघात या प्रकल्पाची घोषणा झाली आहे. प्रकल्पासाठीची जमीन अधिग्रहण सूचना रद्द करावी, अशी मोर्चेकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. वाटत परिसरात प्रस्तावित एमआयडीसी आणि संरक्षण शस्त्र सामग्री कारखाना या दोन्हीच्या विरोधात स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. शेकडो स्थानिक या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. मोर्चेकऱ्यांनी सांगितले की, "आम्ही सगळे शेतकरी आहोत. शेतकऱ्यांच्या वतीनं आमचं एकच म्हणणं आहे की इथे मोठ्या प्रमाणात आंबा, काजू टुरिजम असताना एमआयडीसी सरखे घाट या ठिकाणी का घातले जात आहेत?" लोटे एमआयडीसी आणि जिंदाल कंपनीमुळे प्रदूषणाचा अनुभव येत असल्याचे मोर्चेकऱ्यांनी नमूद केले. कोकण निसर्गसंपन्न असून, अशा ठिकाणी औद्योगिक प्रकल्प आणल्याने विकासाचा उद्देश साध्य होणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. येत्या काळात कोकणात येणारे प्रकल्प पूर्णपणे केमिकल आधारित असून, केमिकलचा मारा झाल्यास कोकणाची समृद्ध भूमी नष्ट होण्याच्या मार्गावर येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. आंबा आणि काजू उत्पादनावरही याचा परिणाम होईल, असे मोर्चेकऱ्यांनी सांगितले. शासनाने भूमिका न बदलल्यास संविधानात्मक अधिकारांचा वापर केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola