Ratnagiri : वाशिष्ठी नदीवरील नवीन पूल आजपासून वाहतुकीसाठी सुरू
गोवा या महामार्गावरील महत्त्वपूर्ण असा वाशिष्ठी नदी वरील नवीन पूल आज वाहतूकीसाठी सुरू करण्यात आला. नुकत्याच चिपळूणमध्ये आलेल्या महापुरानंतर या नदीवरील ब्रिटिशकालीन पूल हा वाहून गेल्याने जवळपास आठ दिवस बंद होता त्यानंतर युद्धपातळीवर काम सुरू करून तो पूल वाहतुकीस खुला केल्यानंतर अवजड वाहतूक त्या पुलावरून एकेरी मार्गाने सुरू होते. मात्र त्या शेजारी असणारा नवीन पूल युद्धपातळीवर काम करून आणि गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सुरु केल्याने वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.