Ratnagiri Beach Zipline : आरे वारे बीचवर झीप लाईनचा विहंगम थरार, समुद्राची नयनरम्य दृश्य

Continues below advertisement

Ratnagiri Beach Zipline : आरे वारे बीचवर झीप लाईनचा विहंगम थरार, समुद्राची नयनरम्य दृश्य 

कोकणात नाताळनिमित्त फिरायला येणाऱ्या पर्यटकांना थ्रीलिंग अनुभव घेता येणार आहे. रत्नागिरी शहरातून गणपतीपुळेकडे जाताना आरे - वारे या ठिकाणी असलेल्या झीप लाईनची मजा पर्यटकांना लुटता येणार आहे. त्यामुळे इतर जलक्रिडांच्या सोबत झीप लाईनची मजा देखील आता पर्यटक घेऊ शकणार आहे. सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात दाखल झालेत. त्यामुळे कोकणातील पर्यटन व्यवसायाला चांगलीच बरकत आलीय. त्याचवेळी पर्यटकांना देखील झीप लाईन्सच्या माध्यमातून एक नवा थ्रीलिंग अनुभव घेण्याचा पर्याय उपलब्ध झालाय. कोकणातील समुद्र किनाऱ्यावर आता झीप लाईनचा थरार अनुभवता येणार आहे. 2022 मध्ये रत्नागिरीतील आरे-वारे समुद्र किनाऱ्यावर झीप लाईन सुरु करण्यात आली आहे.  यामुळे आता ८४ फूट उंचीवरुन समुद्राचं सौंदर्य़ अनुभवता येणार आहे. कोकणात येणाऱ्या आणि अॅडवेंचर स्पोर्टसचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी आता हा एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram