रत्नागिरी जिल्ह्यातील मासे व्यवसायिकांना अच्छे दिन; 'या' देशात होते इतक्या कोटींची निर्यात

रत्नागिरी जिल्ह्यातून सध्या दररोज 15 ते 20 टन म्हणजेच जवळपास 1 कोटींची मासे युरोपीयन देशांकरता निर्यात केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडमधील जेएनपीटी या ठिकाणी ही मासे पाठवले जातात. त्यानंतर जेएनपीटीवरून हे मासे युरोपीयन देशांकरता निर्यात केली जाते. शिवाय, मुंबईकरता देखील विशिष्ठ प्रकारची मासे रवाना केले जातात.  त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात संकटात सापडलेल्या मासे व्यावसायाला आता सुगीचे दिवस येत आहेत. मध्यंतरीच्या काळात वातावरण बदलामुळे देखील मासेमारी व्यवसायाला फटका बसला होता. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola