Ratnagiri Mango : कोकणचा जगप्रसिद्ध हापूसची ऑर्डर आता Amazon वर, उत्पादकांचा मोठा फायदा
फळांचा राजा अर्थात कोकणचा जगप्रसिद्ध हापूसची ऑर्डर आता Amazon वर देखील करता येणार आहे. कारण, थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला हापूस Amazon आपल्या Amazon Fresh या साईटवर उपलब्ध करून देणार आहे. रत्नागिरीतील मिरजोळे येथे संकलन केंद्र सुरू केले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 20 शेतकरी यामध्ये जोडले गेले आहेत. मागील दोन दिवसात 800 डझन आंबा खरेदी केला गेला आहे. जवळपास 185 ते 225 ग्रॅमपर्यतचे पूर्णपणे पिकलेले फळ Amazon शेतकऱ्यांकडून खरेदी करत आहे. ्सोबत टाटा फ्रेश, बिग बास्केट, किसान कनेक्ट सारख्या कंपनी देखील आता कोकणातील हापूस ऑनलाईन उपलब्ध करून देत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हापूसचे 65 हजार हेक्टर क्षेत्र असून अंदाजे उत्पादन हे 2 लाख टनांच्या घरात आहे. त्यातून वार्षिक 200 कोटींच्या घरात उलाढाल होते. मुख्य बाब म्हणजे Amazon सारखी कंपनी ऑनलाईन हापूस विकणार असल्यानं त्याचा फायदा नक्कीच कोकणाती शेतकऱ्यांना होणार आहे.