Coronavirus | रत्नागिरीतील 34 पैकी 21 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह

Continues below advertisement
पुण्याील पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह दाम्पत्याला पाडव्याच्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. ही बाब कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वाची मानली जात आहे. त्यानंतर आता रत्नागिरीतील देखील 34 पैकी 21 जणांचे कोरोनाबाबतचे रिपोर्ट आले आहेत. या 21 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या तरी रत्नागिरीत एक जण कोरोनाबाधित असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती देखील सुधारत आहे. तर, त्याच्या पत्नी आणि भावाचे रिपोर्ट देखील यापूर्वीच निगेटिव्ह आले आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram