Maharashtra Ration Shops : राज्यात आता रेशन दुकानांमध्ये फळं,भाजीपाला विक्रीला परवानगी ABP Majha
Continues below advertisement
आतापर्यंत रेशन दुकानात गहू, तांदुळ, साखर, रॉकेल अशा वस्तूचं लाभार्थ्यांना स्वस्त दरात वाटप करण्यात येतं. मात्र लवकरच रेशन दुकानात फळं आणि भाजीपाला विक्री सुरु होणार आहे. रेशन दुकानात फळं आणि भाजीपाला विक्री करण्यास परवानगी देण्यात आलीय. याची सुरुवात मुंबई, ठाणे आणि पुणे जिल्ह्यातून करण्यात येणार आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने याबाबतचा शासन आदेश जारी केलाय. प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यांसाठी ही परवानगी देण्यात आलीय. राज्यातील रेशन किंवा रास्तभाव दुकाने आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला आणि फळं रेशन दुकानांच्या माध्यमातून विक्री करता येणार आहे.
Continues below advertisement