Ratan Tata Passed Away : मुंबई पोलिसांकडून रतन टाटांना अखेरची मानवंदना
Ratan Tata Passed Away : मुंबई पोलिसांकडून रतन टाटांना अखेरची मानवंदना
भारतीय उद्योगविश्वाचे महर्षि रतन टाटा (Ratan Tata) यांचं निधन झालंय. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ब्रीच कॅण्डी रुग्णालयात रतन टाटांनी जगाचा निरोप घेतला. रतन टाटा यांनी उद्योग विश्वात आपल्या अतुलनीय योगदानाचा अमूल्य ठसा उमटवलाय. रतन टाटा यांच्या निधनामुळे भारतीय उद्योगविश्वाचा आधारवडच हरपलाय. परोपकारी स्वभाव, सामाजिक जाणीव यामुळे रतन टाटा हे सर्वच स्तरातील लोकांसाठी आदर्श व्यक्तिमत्व होते.
1991 ते 2012 या काळात टाटा समूहाचे अध्यक्ष राहिलेले रतन टाटा हे त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जायचे. रतन टाटा हे केवळ चांगले उद्योगपतीच नव्हते, तर ते एक चांगले माणूसही होते. त्याच्यासोबत काम करणाऱ्या लोकांची ते खूप काळजी घ्यायचे, याचे अनेक किस्से आपण नेहमीच ऐकतो. नेहमी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारा माणूस ही त्यांची ओळख होती. कंपनीमध्ये कर्मचारी कोणत्या पदावर आहे, हे त्यांच्यासाठी कधीच महत्त्वाचं नव्हतं, पण तो माणूस आहे, हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. एक किस्सा सांगितला जातो की, रतन टाटा एकदा आपल्या कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतः विमान उडवायला तयार झाले होते.