Ratan Tata Passed Away : रतन टाटांच्या निधनामुळे शासकीय दुखवटा; अमित शाह उपस्थित राहणार
Ratan Tata Passed Away : रतन टाटांच्या निधनामुळे शासकीय दुखवटा; अमित शाह उपस्थित राहणार
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचं वयाच्या 86 वर्षी निधन झालं. बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी 3.30 वाजता रतन टाटा यांच्यावर वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. द्रष्टा, दानशूर, दयाळू, दिलदार, देशप्रमी, नफा-तोटा न पाहणारा उद्योगपती म्हणून रतन टाटा (Ratan Tata) यांची ओळख होती. त्यामुळे रतन टाटा यांच्या निधनानं देशाची मोठी हानी झाली आहे. औद्योगिक क्षेत्रात मोठं योगदान देणारं, देसशेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहे. रतन टाटा यांच्याबद्दल देशातील जनतेला वेगळीच आपुलकी होती. टाटा कंपनीच्या माध्यमातून रतन टाटा यांनी लाखो कुटुंबाना आपलंसं केलं होतं. देशभक्ती व देशहिताचं आदर्श उदाहरण म्हणजे रतन टाटा असंही बोललं जायचं. रतन टाटा यांचा मृत्यू कशामुळे? रतन टाटा यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक होती. त्यामुळे मुंबईतील ब्रीड कँडी रुग्णालयात रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु होते. रतन टाटा यांना सोमवारी (7 ऑक्टोबर) रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजताच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अचानक रक्तदाब कमी झाल्यामुळे रतन टाटा यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.