Rashmi Thackeray tested positive for COVID-19 | मिसेस मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा कोरोना रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला आहेत. रश्मी ठाकरे यांनी  11 मार्चला कोव्हॅक्सिन लस घेतली होती. 20 मार्च रोजी रश्मी ठाकरे यांचे चिरंजीव आणि पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यांनी ट्विट करून ही माहिती देत आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, तसेच कोरोना चाचणी करावी, असे आवाहन केले होते. मात्र आता त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola