Rashmi Shukla Phone Tapping : कोण आहोत रश्मी शुक्ला? काय आहे फोन टॅपिंग प्रकरण?

Rashmi Shukla Phone Tapping : कोण आहोत रश्मी शुक्ला? काय आहे फोन टॅपिंग प्रकरण?

रश्मी शुक्ला... देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात ज्या शासकीय अधिकाऱ्याच्या कामांवर विरोधकांकडून प्रश्न विचारले गेले. ते हे नाव. फोन टॅपिंग प्रकरण हा विषय जरी निघाला तरी रश्नी शुक्ला यांचं नाव आधी डोळ्यांसमोर येतं.  राज्याच्या गुप्तचर विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंगचे गंभीर आरोप झाले होते. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात, तर शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. या सगळ्या प्रकरणानंतर आता पुन्हा त्यांचं नाव चर्चेत आलंय.  आता  या प्रकरणात थेट बड्या राजकारण्यांचा संबंध आहे. त्यामुळेच फोन टॅपींग प्रकणामुळे आपल्या भुवया उंचावतील अशा अशा गोष्टीही बाहेर पडू शकतात. पण हे फोन टॅपींग प्रकरण नेमकं आहे काय पाहूयात या VIDEO च्या माध्यमातून

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola