Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईल
Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईल
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 च्या मतमोजणीचा निकाल दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर झाला. त्या अनुषंगाने राज्यातील विविध मतदार संघात निवडणुकीसाठी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणी दिवशी ईव्हीएममध्ये आलेले आकडे यात तफावत असल्याची बाब राज्यातील विविध वृत्तपत्रात प्रसिध्द झाल्याचे निर्देशनास आले आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 244-करमाळा, 245- माढा, 249—सोलापूर शहर मध्य, 251- सोलापूर दक्षिण या मतदार संघामध्ये मतदान व मतमोजणी मधील आकडेवारीत तफावत दिसून आली. त्याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे.244- करमाळा या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानादिवशी 2 लाख 29 हजार 375 अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली. तथापि मतमोजणी दिवशी 2 लाख 29 हजार 377 अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली. यामध्ये 2 मताची वाढ ही केंद्राध्यक्ष केंद्र क्र.115 यांनी नमूना 17 सी मध्ये मतांचा हिशोब लिहिताना चुकीची नोंद घेतल्याने झाली. सदरची मानवीय चुकीमुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून येते.