Disle Guruji : डिसले गुरुजीनी एवढं मनावर घेण्याची गरज नाही, आम्ही त्यांच्या सोबत आहोत : Bacchu Kadu

डिसले गुरुजीनी एवढं मनावर घेण्याची गरज नाही, आम्ही त्यांच्या सोबत आहोत.. त्यांनी अभ्यासासाठी विदेशात जाण्यासाठीचा अर्ज साध्या कागदावर दिला होता, त्यांचा अर्ज विहित फॉरमॅट मध्ये दिलेला नव्हता. आता त्यांनी अर्ज विहित फॉरमॅट मध्ये दिला आहे, त्यामुळे त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे... दरम्यान काही अधिकाऱ्यांनी जाणीपूर्वक मुद्दामुन असं केलं आहे का याचा शोध आम्ही घेऊ, तसा दिसल्यास कारवाई करू असंही बच्चू कडू म्हणाले..  काहींनी आम्ही अधिकारी आहोत तो शिक्षक आहे अशा भावनेतून असं केलं आहे का असं वाटत असल्याचे ही कडू म्हणाले.. काही जिल्ह्यांमध्ये निश्चितच कोरोनाचा संक्रमण जास्त आहे, त्यामुळे जिथे संक्रमण जास्त आहे अशा ठिकाणी शाळा सध्या तरी सुरू केल्या नाही पाहिजे... मात्र तो निर्णय स्थानिक प्रशासनाला घ्यायचा आहे शिक्षकांच्या कोरोना चाचणी संदर्भात प्रक्रिया सुरू झाली आहे अशी माहिती त्यांनी दिली... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola