Madha Loksabha : रणजित निंबाळकरांना उमेदवारी न दिल्याने मोहिते पाटील नाराज, भाजपची डोकेदुखी वाढली

Continues below advertisement

Madha Loksabha :  रणजित निंबाळकरांना उमेदवारी न दिल्याने मोहिते पाटील नाराज, भाजपची डोकेदुखी वाढली

माढा लोकसभेसाठी इच्छुक असलेले मोहिते पाटील याना भाजपने डावलत पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजित निंबाळकर याना उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील नाराज होते . दोन दिवसापूर्वी या नाराजीचे महानाट्य खुद्द भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनाही अनुभवायला मिळाले होते . यानंतर मोहिते पाटील यांची नाराजी भाजपाला परवडणारी नसल्याचे सांगत याबाबत पक्षश्रेष्टींना बोलणार असल्याचे आश्वासन संतप्त मोहिते समर्थकांना दिल्यावर महाजन यांची सुटका झाली होती . अजूनही भाजपकडून मोहिते पाटील यांच्या बाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसला तरी धैर्यशील मोहिते पाटील यांनी आजपासून माढा लोकसभा मतदारसंघात अनौपचारिक रित्या प्रचाराला सुरुवात केली आहे . 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram