Ranji Trophy: नाशिकमध्ये महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र रणजी सामना, Ravindra Jadeja आणि Ruturaj Gaikwad मैदानात

Continues below advertisement
नाशिकमध्ये रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेचे सामने पुन्हा एकदा रंगणार असून, १ नोव्हेंबरपासून महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र (Maharashtra vs Saurashtra) हा सामना हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर खेळवला जाईल. या सामन्यात भारताचे दिग्गज खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मैदानाची दुरुस्ती, खेळपट्टी आणि खेळाडूंसाठीच्या सुविधांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. या सामन्याव्यतिरिक्त, ८ नोव्हेंबरपासून महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक हा सामनाही नाशिकमध्येच होणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola