Ranichi Baug Mumbai : राणीच्या बागेतील पशू-पक्ष्यांना उष्णतेची झळ; खास गारेगार खाऊ
Ranichi Baug Mumbai : राणीच्या बागेतील पशू-पक्ष्यांना उष्णतेची झळ; खास गारेगार खाऊ वाढत्या उष्म्याने फक्त माणसेच नाही, तर प्राणीही त्रस्त आहेत. या वाढत्या तापमानाचा प्राण्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. उन्हाच्या वाढत्या काहिलीचा फटका भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयातील पशू-पक्ष्यांनाही बसत आहे. त्याच अनुषंगाने विशेष काळजी म्हणून पशू-पक्ष्यांसाठी फळे, फ्रूट आईस केक, लॉलीपॉपची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी दिवसभरातील खाण्याचे वेळापत्रक आखण्यात आले असून त्यानुसार प्राण्यांना गारेगार खाद्य पुरवले जात आहे. राणीच्या बागेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी