Chhatrapati Shivaji Maharaj Statue Malvanराजकीय राड्यामुळे महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार ओशाळला
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Malvanराजकीय राड्यामुळे महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार ओशाळला
महाराजांनी माफ केलं असतं का? असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय... आणि हा सवाल आहे मालवणच्या राजकोट किल्ल्यावर अभूतपूर्व असा राडा घालणाऱ्या नेत्यांना... राजकोटवर परवा शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला.. या पुतळण्याची पाहणी करण्यासाठी, नारायण राणे, निलेश राणे तसंच आदित्य ठाकरे, जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार हे सर्व नेते थोड्या फार वेळाने एकत्रच किल्ल्यावर पोहोचले. मात्र राणे पितापुत्र यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मोठा गोंधळ सुरू झाला... ठाकरेंचे कार्यकर्ते आणि राणेंचे समर्थक आमनेसामने आले...रेटारेटी झाली.. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली. शिवराळ भाषेचा वापर झाला. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्यानंतर पोलिसांचीही दमछाक झाली. काही पोलीस जखमीही झाले. जयंत पाटलांनी दोन-तीन वेळा मध्यस्थी करत राणेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर किल्ल्याबाहेर पडतानाही खुन्नस म्हणता येईल अशी आदित्य ठाकरे आणि निलेश राणेंची नजरानजर झाली..