Narayan Rane VS Thackeray : मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी राणे विरुद्ध ठाकरे घमासान
मुंबई महापालिका निवडणुकीआधी माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले. नारायण राणे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर 'उरलं सुरलेलं उबाटाचं दुकान बंद होणार' अशी टीका केली. राणेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी राणेंना 'वयाचं भान ठेवावं' असा खोचक सल्ला दिला. राऊत म्हणाले की, नारायण राणे यांनी आपल्या वयाचा भान ठेवून बोललं पाहिजे, त्यांनी जुनी भाषा वापरू नये. ती भाषा शिवसेनेमध्ये असताना शोभत नव्हती आणि आता ते काँग्रेस किंवा इतर पक्षात असतानाही शोभत नाही, लोक हसतात, असेही राऊत यांनी नमूद केले. दोन्ही नेत्यांमधील या टीकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.