Pandharpur Wari 2020 | पंढरपुरातील पारंपरिक वारकरी महाराजांना एकादशीला नगर प्रदक्षिणेची परवानगी द्या
Continues below advertisement
: यंदाची वारी कोरोनाच्या सावटाखआली पार पडत आहे. अशातच पायी वारी काढण्यासाठी प्रशासनाने परवानगी नाकारली असून मानाच्या काही मोजक्याच पालख्यांना मोजक्याच हेलिकॉप्टरद्वारे पंढरपूरात नेण्यात येणार आहेत. आषाढी वारी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच पंढरपूरमध्ये उद्या म्हणजे 30 जून दुपारी दोन वाजल्यापासून 2 जुलैपर्यंत संचारबंदी लागू होणार आहे. परंतु, यासगळ्यात वारकऱ्यांकडून एक नवी मागणी होताना दिसत आहे. पंढरपुरातील पारंपरिक वारकरी महाराजांना एकादशी दिवशी नगर प्रदक्षिणेला परवानगी द्यावी, अशी मागणी वारकरी पाईक संघाने केली आहे.
Continues below advertisement