pune Police Attack: रामटेकडी परिसरात पोलिसावर हल्ला, संरक्षण करणारे सुरक्षित नाही

Continues below advertisement

pune Police Attack: रामटेकडी परिसरात पोलिसावर हल्ला, संरक्षण करणारे सुरक्षित नाही

पुण्यात थेट पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला  हल्ल्यात जखमी पोलिस अधिकाऱ्याला केलं रुग्णालयात दाखल  भांडण सोडवायला गेलेल्या अधिकाऱ्यावर टोळक्याने केला हल्ला  वानवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला  रत्नदीप गायकवाड असे हल्ल्यात जखमी झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे  मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील रामटेकडी परिसरात सुरू असलेल्या भांडणात आणि एका टोळीत असलेल्या तरुणाला पकडण्यासाठी गेलेला अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला केला आहे  ... पुणे  आज संध्याकाळी ४ वाजता ससाणे नगर रेल्वे गेटच्या जवळ एक मोटरसायकल  चालक व मागे बसलेले इसम यांची दुसऱ्या दुचाकीवर वरील निहाल सिंग मन्नू सिंग टाक व त्याच्या बरोबरील एक अनोळखी इसम यांच्यामध्ये भांडण सुरू होते.  त्या ठिकाणाहून जाणारे वानवडी पोलीस स्टेशन कडील एपीआय रत्नदीप गायकवाड हे त्यांची गाडी थांबवून भांडणे सोडवण्यासाठी गेले. यावेळी निहालसिंग मन्नू सिंह टाक याने त्याच्याकडील कोयता गायकवाड यांना फेकून मारला. तो कोयता त्यांचे डोक्यात लागला असून, ते जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत  निहाल सिंग मनसिंग टाक व त्याचे बरोबरील अनोळखी साथीदार हे दोघेही पळून गेल्याने त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram