Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याकडे नेत्यांची पाठ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना ?

Continues below advertisement

Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याकडे नेत्यांची पाठ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना ?

मलबार हिलवरील सर्वात प्रशस्त आणि सी-फेसिंग व्ह्यू असलेला बंगला म्हणजे रामटेक बंगला (Ramtek Bungalow) होय. मात्र, याच रामटेक बंगल्याबाबत अनेक घडामोडी घडल्यानंतर अनेक मंत्री नाकं मुरडताना दिसताय. अशातच राजकीय वर्तुळात शुभ-अशुभाची चर्चाही रामटेक बंगल्याबाबत होताना दिसत आहे. यंदा हा बंगला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांना मिळाला आहे.   दरम्यान, माजी मंत्री दीपक केसरकर, एकनाथ खडसे आणि छगन भुजबळ यांचं वास्तव्य ह्याच बंगल्यात होतं. मात्र अलिकडे झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात तिन्ही नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळताना दिसलाय,  त्यामुळे अनेक उलट सुलट अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अशातच, बावनकुळे हा बंगला स्वीकारतात का? हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.   महायुतीच्या 31 मंत्र्‍यांना बंगल्याचं वाटप  राज्यात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अखेर 8 दिवसांनी मंत्र्‍यांचे खातेवाटपही पार पडले. त्यामध्ये, अनेक नेत्यांच्या खात्यांची खांदेपालट करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. तर, काही नेत्यांना पहिल्यांदा मंत्रि‍पदाची संधी मिळाल्यानंतर महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देखील देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ (Minister) खातेवाटपानंतर आता मंत्र्‍यांना  मंत्रालयातील दालनाचे आणि दालनाच्या पाठोपाठ सरकारी बंगल्यांचेही वाटप करण्यात आले. महायुतीच्या 31 मंत्र्‍यांना बंगल्याचं वाटप करण्यात आलं असून त्याची यादीही समोर आली आहे.  त्यानुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक, राधाकृष्ण विखे पाटलांना रॉयलस्टोन, पंकजा मुंडेंना पर्णकुटी, शंभूराज देसाईंना मेघदूत तर गणेश नाईकांना पावनगड बंगला देण्यात आला आहे. धनंजय मुंडेंना सातपुडा, चंद्रकांत पाटील यांना सिंहगड बंगला देण्यात आला आहे. दरम्यान, आधी मंत्रीपदावरुन, नंतर खातेवाटपावरुन काही नेत्यांमध्ये नराजाी पाहायला मिळाली. मात्र, आता बंगले वाटपावरुनही मंत्र्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, गत बहुतांश मंत्र्यांना त्यांचेच बंगले अलोट करण्यात आल्याचं यादीवरुन दिसून येते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram