साताऱ्यातील राजघराण्यात दिलजमाई! खासदार उदयनराजे-रामराजे नाईक निंबाळकरांमध्ये गप्पांचा फड
साताऱ्यातील रामराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजे भोसले या दोन्ही राजघराण्यांमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून वाद टोकाला गेल्याचे चित्र संपूर्ण साताऱ्यासह महाराष्ट्राने पाहिले आहे. लोकसभा-विधानसभेच्या कालावधीत तर हा वाद खूप विकोपाला गेला होता. त्यात लोकसभा निवडणुकीच्या काळात तर उदयनराजे भोसले यांनी फलटण येथे रामराजे यांच्या निवासस्थानी जाऊन राडाही घातला होता. तशी नोंदही पोलीस ठाण्यात आहे. त्याचबरोबर दोन राजघराण्यातील संघर्षामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू होती.